✨ ॥ श्री विठ्ठल-रुक्मिणी प्रसन्न ॥ ✨

श्री विठ्ठल मंदिर संस्थान (रजि.)

आर. के. पुरम, दिल्ली 110022

|| उत्सवोत्सव २०२६ ||

आषाढी एकादशी महोत्सव

"भक्तिभाव, सेवाभाव आणि विठ्ठलनाम यातच आहे आमचा प्राण"

श्री विठ्ठल-रुक्मिणी मूर्ती

1. About Us

श्री विठ्ठल मंदिर संस्थानांची माहिती, इतिहास आणि सेवेचा प्रवास जाणून घ्या.

2. Contact Us

आमच्याशी संपर्क साधा. आपल्या सूचना, सहकार्य आणि शंकांसाठी.

3. आषाढी एकादशी 2026

२०२६ सालच्या आषाढी एकादशी महोत्सवाची संपूर्ण माहिती व नियोजन.

पुढे वाचा ➔

नियोजन बैठक अहवाल व सहकार्याचे आवाहन

सर्व विठ्ठलभक्तांना सप्रेम नमस्कार.

येणाऱ्या २५ जुलै २०२६ रोजी आषाढी एकादशी निमित्त श्री विठ्ठल मंदिर संस्थान (रजि.), आर. के. पुरम येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या उत्साहात, भक्तिभावाने व सेवाभावाने भव्य महोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे.

त्या अनुषंगाने दि. १४ जून २०२६ रोजी मंदिर परिसरात नियोजन बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीत कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. त्यामध्ये पुढील बाबींचा समावेश होता :

सुमारे ३,००0 भाविकांसाठी महाप्रसादाची व्यवस्था
स्वयंसेवकांचे नियोजन
भविष्यातील मंदिर सेवेसाठी ५०० स्टीलच्या प्लेट्स खरेदी करण्याचा प्रस्ताव
फळे व शीतपेयांची व्यवस्था
मंदिर परिसरात भाविकांच्या सोयीसाठी मंडप उभारण्याबाबत चर्चा
लाईटिंग व डेकोरेशन व्यवस्था
पिण्याच्या पाण्याची व्यवस्था (बॉटल्स व कॅन्स)
कीर्तन मंडळी व त्यांचे लॉजिस्टिक्स नियोजन
महाप्रसादासाठी आवश्यक अन्नधान्य व साहित्य
टोपी, उपरणे व बॅजेस
कीर्तन सेवेचे आयोजन
मंदिर, पालखी व परिसर सजावटीसाठी फुलांची व्यवस्था
सुमारे १२ कुलर्सची व्यवस्था
सुरक्षा रक्षक, वेटर्स व इतर सेवकवर्गाची व्यवस्था
टी.व्ही. स्क्रीन, मीडिया कव्हरेज व युट्यूब प्रसारण
देवासाठी विशेष वस्त्र व्यवस्था
सोशल मीडिया, मीडिया बाईट्स, ग्रुप संदेश व पोस्टर डिझाईन यासंबंधी नियोजन

यंदाच्या आषाढी एकादशी महोत्सवासाठी अंदाजे ₹७,००,००० ते ₹७,५०,००० इतका खर्च अपेक्षित आहे.

त्यामुळे सर्व विठ्ठलभक्तांना नम्र विनंती आहे की, ज्यांना या पुण्यकार्यात आर्थिक स्वरूपात योगदान द्यायचे असेल त्यांनी आपल्या इच्छेनुसार व सोयीनुसार देणगी द्यावी. देणगीसाठीचा QR Code व इतर तपशील ग्रुपमध्ये शेअर करण्यात येईल.

तसेच, वरील नमूद केलेल्या विविध सेवांपैकी कोणत्याही एका सेवेची संपूर्ण जबाबदारी स्वीकारण्याची इच्छा असल्यास किंवा ती सेवा स्वखर्चाने/दानरूपाने उपलब्ध करून द्यायची असल्यास कृपया समितीशी संपर्क साधावा.

🌸 आपल्या सर्वांच्या सहकार्याने आणि श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या कृपेने यंदाचा आषाढी एकादशी महोत्सव अधिक भव्य, दिव्य आणि यशस्वी होईल, असा आम्हाला विश्वास आहे. 🌸